काय सांगता… व्हॉट्सअ‍ॅपमध्ये होणार व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीसाठी व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच त्यात बदल करत असते. फोटो, डॉक्यूमेंट्स आणि व्हिडिओची देवाण-घेवाण करण्यासाठी जनता व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत असतात.

म्हणूनच या लोकप्रिय अ‍ॅपचे जगभरात सुमारे 228 कोटी युझर्स आहेत. दरम्यान नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर्स ऍड करण्यात आले आहे.

यामुळे आता तुम्हाला व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग करणे शक्य होणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी युझर्सनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

त्यामुळे आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅपचाने एक मोठा बदल केला आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप कॉल करतांना व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंगची सेवा वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे.

त्यासाठी वापरकर्त्यांना ‘क्यूब’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतरच ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग करता येणार आहे.

अशा पद्धतीने रेकॉर्डिंग करा व्हिडीओ कॉल अ‍ँड्रॉईड युझर्सना व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर त्यांना क्यूब कॉलअ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल.

क्यूब कॉल रेकॉर्डर अ‍ॅप सुरू करुन त्याच्या सेटिंग्जमध्ये जावं लागेल आणि वॉईस कॉल यामध्ये जाऊन Force Voip वर क्लिक करावं लागेल.

त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करायचा आहे त्याला व्हॉट्सअ‍ॅपवरुन कॉल करायचा आहे. यावेळी तुम्हाला क्यूब कॉल रेकॉर्डर सुरू असलेला दिसेल.

याचा अर्थ तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. पण या सेटिंग्ज करुन सुद्धा तुमचा कॉल रेकॉर्ड होत नसेल तर तुमच्या फोनमध्येच ही सेवा उपलब्ध नाही हे समजून घ्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24