अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- महाविकास आघाडीतील पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अहमदनगर शहरातील जगताप समर्थक निराश झाले आहेत.राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळेल, असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. पण मंत्रिपदाची हुलकावणी मिळाल्याने शहरातील त्यांचे समर्थक निराश झाले आहेत.
हे पण वाचा : या कारणामुळे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद नाही मिळाले ….
दरम्यान मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने आ संग्राम जगताप समर्थक चांगलेच नाराज झाले असून सोशल मिडीयावर आक्रमक झाले आहेत सोशल मिडीयावर आमदार संग्राम जगताप यांची पक्षनिष्ठा म्हणजे नेमकं काय? असा एक संदेश व्हायरल होत आहे तो पुढीलप्रमाणे ….
आ. संग्राम जगताप यांनी त्यांच्या आजवरच्या सर्व निवडणुका या घड्याळ म्हणजेच राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढविल्या आहेत. शरद पवार यांनी स्वतः संग्राम जगताप यांचे वडील आ. अरुण जगताप यांना खासदारकीसाठी विखे यांच्या विरोधात नगर जिल्ह्यातून कोणीही उभा राहण्यास तयार होत नाही, त्यामुळे ही निवडणूक तुम्हालाच (जगतापांना) लढवावी लागेल, असे सांगत विखेंच्या विरोधात निवडणूक लढण्याची गळ घातली होती.
हे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात….
पवार साहेबांच्या शब्दाचा मान ठेवत आ. संग्राम जगताप यांनी विखेंसारखे मोठे साखरसाम्राट प्रस्थ अवघ्या पंधरा दिवसाच्या तयारीत अंगावर घेतले व कडवी लढतही दिली होती. या खासदारकीच्या निवडणुकीनंतर अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली. आ. संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस व पवार साहेबांची एकनिष्ठ राहत परत जोमाने विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आणि सन्मानपूर्वक दुसऱ्यांदा ही विजयी झाले.
हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार
अहमदनगर शहरात अगदी दुबळा असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम आ. संग्राम जगताप यांनी तरुण-जेष्ठांचे संघटन करून सर्व शहरात अनेक शाखा उभारत आजवर केले आहे. एवढच काय, ज्या नगर शहरात बोटावर मोजण्याइतके राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असायचे, त्या नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा निर्माण करत अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर विराजमान त्यांनी केले.
हे पण वाचा : अहमदनगर ब्रेकिंग :- चाकूने भोसकून तरुणाचा खून
प्रथमच निवडून आलेले सन्मानीय आ. प्राजक्त तनपुरे जे मामांच्या कृपेने (वशिला) नगर जिल्ह्यातून नवनिर्वाचित राज्यमंत्री झाले आहेत, त्यांना शुभेच्छा देत आदर सत्कार तर आम्ही शहराच्यावतीने करुच. मात्र त्यांच्या मातोश्री डॉ. उषा तनपुरे या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या होत्या आणि पराभूत झाल्या होत्या, हे समस्त नगर जिल्ह्यातील जनता विसरलेली मुळीच नाही.
हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !
त्यामुळे कोणी जर पक्षनिष्ठा या शब्दावरुन मंत्रीपदाचं वाटप झालं असं सांगत असेल तर जनतेला भोळं समजण्याची घोडचूक तुम्ही करत आहात, एवढंच या निमित्ताने सांगू वाटेल. सोशल मीडिया सारखी माध्यम उघडून आज जर पाहिलं जरी भल्लालदेवाचा राज्याभिषेक झाला असला तरी चर्चा मात्र बाहुबलीचीच आहे हे तुमच्या लक्षात येईल.त्यामुळे आ. संग्राम जगताप यांची पक्षनिष्ठा कुणी काढण्याची गरज नाही. ती आदरणीय शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगली माहिती आहे.