अहमदनगर लाईव्ह 24 टीम /नागपूर : बहुचर्चित कर्जमाफी अखेर आज झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घोषणा केली आहे.
महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज घेतलं असेल तर ते सर्व शेतकरी पात्र
या योजनेसाठी हे शेतकरी असतील पत्र
राज्यातील छोटे- मोठे सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र
फक्त पीककर्ज कर्ज माफ होईल
कर्ज दोन लाखापेक्षा जास्त असेल, त्यांचं दोन लाखापर्यंतचंच कर्ज माफ होईल.
कर्जमाफीसाठी कोणालाही फॉर्म भरायची गरज नाही
शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी मिळेल
शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील मार्च 2020 पासून महात्मा फुले कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरु