काय करणार आमदार शिवाजी कर्डिले पराभूत झाल्यानंतर ? वाचा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पाथर्डी :- मी पैलवान गडी आहे. कुस्तीतल्या मैदानाप्रमाणे राजकीय आखाड्यामध्ये अनेक जय पराजय पाहिलेत. अनेकवेळा माझ्यावर मोठे आघात झाले. अनेक संकटे माझ्यावर राजकीय सुडबुध्दीने लाधली गेली.

मात्र नितीमत्तेच्या बळावर मी सर्व आडचणींवर मात करू शकलो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या पराभवाने खचुन न जाता अध्र्या रात्री मला हाक द्या, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.

आजपासून आपण मतदार संघाची फेरी पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केली. माजी आ.कर्डिले यांनी तशी घोषणा करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्या घोषणेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

पाथर्डी तालूक्यातील करंजी येथील घोरदरा पाझर तलावातील पाण्याचे जलपुजन माजी आ.कर्डिले यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले.

या तलावाच्या पाणीगळतीचा पंचवीस वर्षापासूनचा रखडलेला प्रश्न ५५ लाख रुपये खर्च करून सोडवला आहे. माजी आ.कर्डिले नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच सार्वजनिक कार्यकमात सक्रीय झाल्याने कार्यकत्यांमध्ये मोठा उत्साह संचारल्याचे दिसुन आले.

माजी आ.कर्डिले येणार म्हणून ३९ गावातील अनेक कार्यकर्ते सकाळीच करंजीत दाखल झाले होते. जलपुजन प्रसंगी उपस्थितांसमोर बोलतांना ते म्हणाले राजकीय जीवनात कोणी अमरपट्टा घेवून आलेलं नसतं.

पराभवाने खचुन गेलेलो नाही !

सत्ता पदापेक्षा लोकांचे प्रेम खुप महत्त्वाचे असते आणि ते प्रेम पंचवीस वर्ष जिल्ह्यातील सर्वसामांन्य जनतेने मला दिले आहे. पराभवाने आपण कुठल्याही प्रकारे खचुन गेलेलो नाही अथवा निराशही झालेलो नाही.

कोणत्याही कार्यकत्याला वाऱ्यावर सोडणार नाही.

सत्ता असो अथवा नसो काम करण्याची धमक बाळगुनच पुन्हा घराबाहेर पडल्याने कोणत्याही कार्यकत्याला वाऱ्यावर सोडणार नाही. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील जनतेने दोनदा आमदार होण्याची संधी दिली.

कोणाला दोष देणे चुकीच ठरेल !

त्यामुळे माझ्या पराभवाची जबाबदारी मी स्वत: घेत असून कोणाला दोष देणे चुकीच ठरेल. मतदारसंघाच्या विकासकामांसाठी एवढी कामे मंजूर करून ठेवलीत की पुढील पाच वर्ष तीच कामे गावागावात सुरू असल्याले तुम्हाला दिसतील.

पंकजा मुंडे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहणार

सन २००९ ला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी मला भाजपचे तिकीट दिल्याने मला राहुरी मतदारसंघाचा दोनदा आमदार होता. आले ज्या मानसाने राजकारणात मला पुन्हा उभे केले त्यांचे उपकार विसरणे शक्य नाही. त्यामुळे त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24