कधी होणार शाळा सुरु ? पहा काय म्हणाल्या अहमदनगर मध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- सध्या राज्यात कोरोनामुळे राज्यात शाळा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. मात्र, यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पाठय पुस्तकांचे शंभर टक्के वाटप करण्यात आले आहे. राज्यातील काही शिक्षकांनी अतिशय सुंदर व प्रेरणादायी उपक्रम राबवून मुलांना ऑनलाईन शिकवण्याचे कार्य सुरू केले, असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली 

औरंगाबादकडून मुंबईकडे जाताना मंत्री गायकवाड अहमदनगरमध्ये थांबल्या होत्या. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

गायकवाड म्हणाल्या, “15 जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली असली, तरी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रत्यक्षात शाळा सुरू होवू शकलेल्या नाहीत.

अशा परिस्थितही  राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले आहे.” शाळा सुरू करण्याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. जागतिकपातळीवर देखील हा विषय चर्चेत आले.

अमेरिकेने शाळा सुरू केल्या होत्या. परंतु तेथील मुलांना संसर्ग झाला. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणेच राज्यातील शाळा सुरू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24