अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर विद्यापीठांच्या अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या. परंतु विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याबाबत राज्य सरकारला संघर्ष करावा लागला.
मात्र सुप्रीम कोर्टानं अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिला. यावर बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्रसाद तनपुरे म्हणाले, अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना वेठीस धरणार नाही. या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर व्हावे, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी कुलगुरूंची समिती गठित केली आहे.
सोमवारपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेऊन परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करून विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर करू, असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला. नगरच्या राष्ट्रवादी भवन येथे शनिवारी राज्यमंत्री तनपुरे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्याचा आम्ही आदर करतो. विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत काय दिशा ठरवायची, यासाठी आज बैठक घेतली. या कॅबिनेट मंत्री उदय सामंत, मी स्वत:, शिक्षण संचालक, उपसंचालक तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते. बैठकीत कुलगुरूंची समिती स्थापन केली केली असून
त्यांनी वेळ न घालविता तातडीने परीक्षा होती सूचना देण्यास सांगितले आहे. येणार्या सूचनांवर पुन्हा सोमवारी अंतिम चर्चा करणार आहोत. हा विषय सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालत, राज्यपालाशी चर्चा करून परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या डोक्यावर असणारी टांगती तलवार दूर करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान , भाजपचे आ. आशिष शेलार यांनी एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, असा आरोप करत “आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!,
असं त्यांनी ट्वीट केलं होत. आणि या ट्विटला राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी “आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील.
पण आशिष शेलारजी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं. आता त्यासाठी किमान आपल्या tweet खालील रिप्लाय तरी वाचाल” असे ट्विट करत प्रतिउत्तर दिले होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved