महाराष्ट्र

प्रवास करत असताना बघितली ड्रॅगन फ्रुटची शेती आणि स्वतःच्या शेतात केली लागवड! आज एकरी मिळवतात 4 ते 5 लाख रुपये नफा

Published by
Ahmednagarlive24 Office

सध्या आजकालचे तरुण मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये फळबागांची लागवड करताना आपल्याला दिसून येत आहेत व यामध्ये सिताफळ, डाळिंब, पेरू, द्राक्ष या व इतर फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीकडे देखील कल वाढवल्याचे दिसून येत आहे.

एवढेच नाही तर उत्तर भारतात उत्पादित होणाऱ्या सफरचंदाचा प्रयोग देखील महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी यशस्वी केलेला आहे. त्यामुळे या फळ शेतीच्या माध्यमातून अनेक शेतकरी आर्थिक समृद्धीचे दिशेने आता वाटचाल करताना दिसत आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावचे अजय रघुनाथ सातपुते व जयदेव सातपुते या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी देखील आधुनिक शेतीची कास धरत ड्रॅगन फ्रुट लागवडीचा यशस्वी प्रयोग करून त्यामध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात ते यशस्वी झालेले आहेत.

सातपुते बंधू ड्रॅगन फ्रुट लागवडीतुन मिळवतात लाखोत नफा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अजय रघुनाथ सातपुते आणि जयदेव रघुनाथ सातपुते हे बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावचे रहिवासी आहेत. सातपुते बंधू एकदा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जात असताना त्यांना प्रवासादरम्यान रस्त्यात एका शेतामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवड केलेली दिसले. त्यामुळे कुतूहलाने नेमके हे कोणते पीक आहे याबद्दलची माहिती घेण्यासाठी ते त्या शेतामध्ये गेले व त्यांनी या फळाबद्दलची संपूर्ण माहिती संबंधित शेतकऱ्याकडून घेतली व पूर्ण शेतीची बारकाईने पाहणी केली व नेमके हे पिकाचे व्यवस्थापन कसे करावे लागते? इत्यादी बद्दलची माहिती जाणून घेतली.

तेव्हा त्यांनी निश्चय केला की आपण देखील आपल्या स्वतःच्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड करून चांगले उत्पादन घ्यायचे. तेव्हा त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निर्णय घेतला व सुरुवातीला फक्त एका एकर क्षेत्रामध्ये प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. जर आपण नेकनूर गावाचा परिसर पाहिला तर त्या ठिकाणी पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर आहे व जमीन देखील सुपीक नसून ती मोठ्या प्रमाणावर खडकाळ स्वरूपाची आहे.

त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पारंपारिक शेतीतून आर्थिक उत्पन्न मिळणे दुरापास्त होत होते. परंतु या दोघांनी खडकाळ जमिनीवर देखील ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला. सुरुवातीला एक एकर पासून सुरुवात करून त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीचे क्षेत्र तीन ते चार एकरवर नेऊन ठेवले आहे. तसेच या ड्रॅगन फ्रुट लागवडीच्या माध्यमातून एकरी चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न सहजतेने मिळवत आहेत.

तसेच बाजारामध्ये ड्रॅगन फ्रुटला मागणी देखील चांगली आहे. यामागील जर आपण प्रमुख कारण पाहिलं तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या फळाची खूप मदत होते. तसेच डायबिटीस आणि तसेच हृदयविकाराचा धोका देखील कमी होण्याची शक्यता असते. ड्रॅगन फ्रुट मध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट तसेच फायबर आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असल्याने हे आरोग्यदायी फळ आहे. त्यामुळे बाजारात चांगला दर कायम मिळत असतो व ही शेती कमी खर्चात चांगलं उत्पन्न देते.

Ahmednagarlive24 Office