अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणे, नद्या ओसंडून वाहू लागली आहे. ठिकठिकाणी पावसामुळे छोटं छोटी गाव, वाड्यावस्त्या जलमय झाल्या आहेत.
या जोरदार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. याच दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी चक्क शेतकऱ्यांसमवते बैलगाडीतून प्रवास केला.
परतीच्या पावसाने झोडपल्याने तालुक्यातील जाफराबाद येथील साठवण तलाव यंदा पुर्णक्षमतेने भरला आहे. तलावातील पाणीसाठ्यामुळे नायगावसह जाफराबाद शिवारातील खरीपाचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, आमदार कानडे श्रीरामपूर येथुन सकाळी गोदावरी नदी परिसरात जाण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांना वैजापूर-श्रीरामपूर खडेमय रस्त्याचा सामना करावा लागला.
रस्त्यावरील खड्डे चुकवत अखेर त्यांनी नायगाव शिवार गाठले. अतिपावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आमदार कानडे यांनी बैलगाडीतुन प्रवास केला.
चिखलमय शिवार रस्त्यावरुन बैलगाडीतुन प्रवास करत आमदारांनी बाधित पिकांची पहाणी केली. नुकसानीचा आढाव घेत नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने भरपाई मिळवुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तहसीलदार प्रशांत पाटील आणि प्रांताधिकारी अनिल पवार यांनी नुकसानीची पहाणी करुन पंचनामे करण्याच्या सुचना तलाठी आणि ग्रामसेवकांना दिल्या.
तिपावसामुळे खराब झालेल्या सोयाबीन, कापुस, मका, ऊस, बाजरी पिकांची आमदार कानडे यांनी प्रत्यक्ष पहाणी करुन नुकसान भरपाईची ग्वाही दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved