अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘कर्जत-जामखेडमध्ये गेली ३० वर्षे विकास झाला नव्हता म्हणून त्या मतदारसंघातून लढलो. आता इथं विकासाचं असं मॉडेल निर्माण करेन की भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी आज बोलून दाखवला.अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
तुमचं संगमनेरवर प्रेम आहे, की प्रवरानगरवर? अशी गुगली अवधूत गुप्ते यांनी रोहित पवारांना टाकली. त्यावर, अहमदनगर
जिल्ह्यातील एका मतदारसंघाचा आमदार आहे त्यामुळे माझं नगर जिल्ह्यासह राज्यावर प्रेम आहे, असं उत्तर रोहित पवारांनी दिलं. जेव्हापासून मी पत्रकारांशी बोलायला लागलो तेव्हापासून अशी उत्तरं द्यायला लागल्याचं रोहित म्हणाले.
हडपसरचे जावई असूनही तो मतदारसंघ न निवडता कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला. ‘हडपसर मतदारसंघ सोपा होता हे तुम्ही मान्य केलं, पण कर्जत जामखेडचा गेल्या तीस वर्षांपासून विकास झाला नव्हता. कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या विकासाबद्दलचा अजेंडा रोहित यांनी यावेळी मांडला.
ज्यांचं लग्न झालं आहे, त्यांना कळेल सासुरवाडीचं गणित जमवणं किती अवघड असतं.’ असं रोहित पवार म्हणताच एकच हशा पिकला.कर्जत जामखेडच्या लोकांमध्ये साखरेचे दोन-चार खडे जास्त आहेत. माझ्या आयुष्यात घराणेशाहीचा विषयच काढणार नाही.त्यामुळे मी कर्जत जामखेड निवडलं, असं रोहित पवार म्हणाले.
1. तात्या विंचू की कवट्या महाकाळ? – कवट्या महाकाळ
2. मुख्यमंत्री म्हणून भविष्यात कोणाला पाहायला आवडेल?- अजित पवार की सुप्रिया सुळे – पवारसाहेब ज्यांना ठरवतील ते
3. कोणाकडून अधिक अपेक्षा आहेत? सुजय विखे की सत्यजीत तांबे – दोघांकडून अनेक अपेक्षा आहेत.
4. जवळचं काय? कर्जत जामखेड की बारामती – लढायला शिकवलं ते कर्जत जामखेड
‘महाविकास आघाडीचे मन मोठे होते म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. भाजपचं मन तितकं मोठं नव्हतं,’ असा चिमटा रोहित पवार यांनी यावेळी काढला.काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर काम करणं सोपं आहे. हे आपल्यातील लोक वाटतात,’ असंही त्यांनी सांगितलं.
हरायचं नाही हे आजोबांकडून शिकलो !
‘परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी लढत राहायचं. हरायचं नाही, हे मी पवार साहेबांकडून शिकलो. अनेकांना वाटलं होतं पवार साहेब आता रिटायर होतील. पण रिटायर होणार नाही हे पवार साहेबांनी दाखवून दिलं. ते मला खूप महत्त्वाचं वाटतं,’ असं रोहित म्हणाले.
मी जिंकलो म्हणून वडिलांच्या डोळ्यात पाणी नव्हतं तर मला खूप लोकांनी निवडून दिलं म्हणून वडिलांच्या डोळ्यात पाणी
होतं. माझ्या विजयात आईचा वाटा मोठा आहे. कारण आईच स्वतः मतदार संघात गेली होती. लोकांचा विश्वास तिने संपादन
केला. आईला खोटं आवडत नाही, तिने विकासाचा शब्द दिला, तो मी पूर्ण करणार, अशी ग्वाही रोहित पवारांनी दिली.
किती लोकांना वाटलं पवार साहेब रिटायर होतील. पण ते म्हणाले, नाही, हार मानायची नाही आणि कितीही संकटं आली तरी झुकायचं नाही, प्रामाणिक वागा, लोकांमध्ये जा, मग तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही, हे पवार साहेबांकडे पाहून आम्हाला कळतं, असं रोहित पवारांनी सांगितलं.