Maharashtra News:टीकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांची हत्याप्रकरणी तपासाला वेग आला आहे. ही हत्या का आणि कशी झाली, याबद्दलचे भयानक वास्तव समोर आले आहे.
आरोपींनी फोगटची मालमत्ता, आर्थिक संपत्ती हडपणे तसेच तिची राजकीय कारकीर्द संपवण्याच्या उद्देशाने तिला जबदस्तीने ड्रग्ज दिली.
ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे सोनाली फोगट यांचा मृत्यू झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी स्वीय सहायक सुधीर सांगवान आणि सचिव सुखविंदर सिंग पाल या फोगाट हिच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे.
त्यांनी ही हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. यासंबंधी सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. आरोपी सुधीर व सुखविंदर यांनी २२ ऑगस्ट रोजी रात्री फोगाट हिला जबरदस्तीने ड्रग्ज दिले.
पाण्यात मिसळून तिला प्यायला दिले. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे सोनालीची प्रकृती बिघडली. घाबरलेल्या आरोपांनी तिला त्याच अवस्थेत हॉटेलच्या रुममध्ये बाथरुममध्ये नेले. तेथे तब्बल दोन तास ते आतमध्येच होते. आरोपींनी आता गुन्ह्याची कबुली दिली आहे.