अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- दुधाचे भाव 32 रुपयांवरून 18 रुपयांवर आले. त्यामुळे दुधावर अवलंबून असणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे खुराकाचा भाव मात्र कमी झालेला नाही त्यामुळे पशुधन कसे जगवायचे हा दूध उत्पादक शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे.
सत्तेत गेल्यावर लोकांच्या प्रश्नाचा लगेच कसा विसर पडतो हे आश्चर्य आहे. एरवी फोडाफोडीचे राजकारण करणारे दुधाच्या प्रश्नबाबत गप्प का? अशी टीका जि.पचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी आमदार लंके यांचे नाव न घेता केली आहे.
तालुक्यातील चिंचोली येथील एका चिंचोली मळाई देवी मंदिर ते रस्त्याचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.ते म्हणाले की, आपल्याला मिळालेला सत्तेचा विधायक कामासाठी वापर जो करतो त्याला लोक प्रतिनिधी म्हणतात.
यावेळी झावरे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या बंधारा पूर्ण क्षमतेचे भरलेल्या दोन्ही बंधाराचे जल पूजन करण्यात आले. याप्रसंगी गावातील ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com