उशिरा का होईना, श्रीगोंद्याच्या आमदारांनी या प्रश्नी लक्ष घातले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदे :- कुकडी कालव्याचे आवर्तन शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता जलसंपदा विभागाने घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी मंगळवारी पत्रकाद्वारे केले.

कुकडी कालव्याचे पाणी सोडण्याच्या सुरुवातीपासून आपण मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. उशिरा का होईना, श्रीगोंद्याच्या आमदारांनी या प्रश्नी लक्ष घातले.

आता अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी वाढली आहे. नियोजनानुसार त्यांनी सर्व शेतकऱ्यांना पाणी द्यावे. त्यांना गरज असेल, त्या ठिकाणी आमची मदत मिळेल.

हस्तक्षेपामुळे सर्वांना पाणी देता आले नाही, असा कांगावा कोणाला करता येऊ नये. हे आवर्तन शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. शेतकरी किंवा चारीचा भाग वंचित राहिल्यास अतोनात नुकसान होणार आहे, असेही शेलार म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24