Oil Using Tips : लाकडी घाण्याचे तेल वापरावे का नाही ? आरोग्यासाठी चांगले तेल रिफाईंड की लाकडी घाण्याचे ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oil Using Tips : दैनंदिन आहारात तेल हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आहारात वापरल्या जाणाऱ्या तेलाची शुद्धता आणि प्रमाण किती असावे, हेही तितकेच महत्त्वाचे असते. अन्यथा त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

मात्र, आरोग्यासाठी कुठले तेल चांगले आहे, रिफाईंड की लाकडी घाण्याचे? हा प्रश्न नेहमीच पडतो. बहुतांशी जण रिफाईंड तेल वापरतात. आहारतज्ज्ञ मात्र लाकडी घाण्याचे तेल वापरण्याचाच सल्ला देतात.

रिफाईंड तेलापेक्षा लाकडी घाण्याच्या तेलाचा दर जास्त असतो. त्यामुळे बहुतांशी कुटुंबात रिफाईंड तेल वापरले जाते तर काहींचे तेलांबाबत अज्ञान असते. बाजारात जे उपलब्ध आहे ते तेल घेऊया, अशी बहुतांशी जणांची मानसिकता असते. मात्र, आहारातील तेल हा घटक आरोग्यावर थेट परिणाम करणारा आहे.

त्यामुळे रिफाईंड तेल वापरत असाल तरी ते बदलून वापरावे. म्हणजेच सोयाबीन तेल एक महिना वापरले तर पुढील महिन्यात सूर्यफुल तेल वापरावे. त्यानंतर शेंगदाणा तेल वापरावे, असाही सल्ला तज्ज्ञ देतात आणि शक्य असेल तर लाकडी घाण्याचे तेल सर्वाधिक चांगले असेही तज्ज्ञांनी सांगितले.

महिन्याला किती तेल खावे

महिनाभरात एका व्यक्तीने साधारणतः अर्धा लिटर तेल खावे. म्हणजेच चार माणसांच्या कुटुंबाला महिन्यात जास्तीत जास्त दोन लीटर तेल वापरले पाहिजे.

आरोग्यासाठी कोणते तेल अधिक चांगले ?

रिफाईंड तेल अधिक तापमानावर तयार केले जाते. त्यामुळे बियाण्यांतील जीवनसत्वे कमी होतात. तसेच या तेलात केमिकलचाही वापर केला जात असल्याचे सांगितले जाते. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

मोठी प्रक्रिया केल्यानंतर रिफाईंड तेल तयार होते. त्यामुळे या तेलातील शरीरासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्व नष्ट होतात. याउलट लाकडी घाण्यातून तेल काढतानाची प्रक्रिया एकदम साधी असते. त्यामुळे या तेलात जीवनसत्व टिकून राहतात. म्हणून आरोग्यासाठी आहारात लाकडी घाण्याचे तेल वापरणे अतिशय गरजेचे असते. घाण्याच्या तेलासमवेत गायीच्या तुपाचाही आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

लाकडी घाण्याचे तेल

■ घाण्याचे तेल हे बियाण्यापासून लाकडी घाण्यावर दाबून तयार केले जाते.

■त्यामुळे त्या बियाण्यांमधील जीवनसत्व कायम राहतात.

■त्यामुळेच हे तेल आरोग्यासाठी चांगले असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

तेलाचे दर काय प्रतिलिटर

■ करडी: १८० ते १९०

■सूर्यफुल १२५ ते १३०

■शेंगदाणा १८० ते १९०

■सोयाबीनः १०५ ते ११५