अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विधवा मुलीची छेड काढून सतत तिला त्रास देणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या मुलीच्या 67 वर्षाच्या वडील या तरुणाची हत्या केली आहे.
हे पण वाचा :- ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील
बदलापूरच्या शिरगाव परिसरातील माऊली चौकात दुपारी ही धक्कादायक घटना घडली आहे. सचिन शिंदे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो सांगली येथे राहणारा होता.
हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !
बदलापूर पूर्व भागात राहणारे नामदेव कोईंदे (६७) हे माजी पोलिस कर्मचारी असून, गेल्या काही महिन्यांपासून सांगली येथे राहणारा सचिन शिंदे (२६) हा तरुण कोईंदे यांच्या मुलीला सोशल मीडियाचा वापर करत त्रास देत होता.
एक महिन्यापूर्वी सचिनविरोधात बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यामध्ये अदखलपात्र तक्रारही दाखल करण्यात आली होती.
हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार …
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,देव यांची मुलगी विधवा असून ती तिच्या लहान मुलाला शाळेत सोडायला जायची.त्यावेळी सचिन तिला रस्त्यामध्ये अडवून लग्न करण्याची मागणी करायचा.
सचिन तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. मात्र देव यांच्या मुलीला हे मान्य नव्हते. दरम्यान, पोलिसांनी सचिनला समज सुध्दा दिला होता. मात्र तरी सुध्दा सांगलीवरुन येऊन सचिन तिला त्रास देत होता.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : नालायक शिक्षकाने १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे केली सेक्सची मागणी !
सचिनच्या या वागण्यामुळे आरोपी देव कोयंडे संतप्त झाले होते.आज नातवाला शाळेत सोडायला जात असताना शाळेजवळ कोयंडे यांना सचिन रिक्षात बसलेला दिसला.
त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी स्वताबरोबर आणलेल्या चाकूने सचिनची भर चौकात रस्तावर हत्या केली.त्यानंतर त्यांनी नातवाला शाळेत सोडले आणि पोलीस स्टेशन मध्ये येऊन सचिनची हत्या केल्याचे कबूल केले.
हे पण वाचा :- जत्रा पाहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार
आरोपी देव कोयंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत बदलापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी पिता सचिनची हत्या केल्यानंतर चाकू कपड्यात गुंडाळून नातवाला सोडायला शाळेत गेला होता.
सचिन शिंदे याच्यावर यापूर्वीच पोलिसांकडून कारवाई का करण्यात आली नाही याचा तपास सुरू झाले. यापूर्वीच छेड़छाड प्रकरणात सचिनवर कारवाई झाली असती तर हा प्रकार घड़ला नसल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
हे पण वाचा :- 5 वर्षे मंत्री राहूनही जे राम शिंदेना करता आले नाही ते रोहित पवारांनी महिन्यात करून दाखवले !