नगर :- परिसरात केडगाव भागात रेणुका देवी मंदिराच्या पाठीमागे राहणारी विवाहित महिला स्री, सारिका सचिन गायकवाड, वय ४३ वर्ष हिने आत्महत्या केली.
सारिका तिच्या सासरी नांदत असताना तिचा पती आरोपी सचिन उर्फ जॉन अशोक गायकवाड हा तिला नेहमी दारु पिवून येवून त्रास द्यायचा, मारहाण करायचा, पती सचिन याच्या दारू पिण्याच्या व्यसनाला व मारहाण त्रासाला कंटाळून सारिक सचिन गायकवाड हिने आत्महत्येस प्रवृत्त होवून दौंड – मनमाड रेल्वे मार्गावर केडगाव शिवारात रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली.
या आत्महत्येस तिचा पती सचिन अशोक गायकवाड़ हाच जबाबदार असून त्यानेच तिला त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केले. वरीलप्रमाणे मयत सारिका यांचे भाऊ दिनेश दादू कांबळे, रा. सर्जेपुरा, नगर यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी सचिन उर्फ जॉन अशोक गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.