अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोल्हापूर :- कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून आणि तोंडावर ठोसे मारून अमानुषपणे खून केल्याची घटना करवीर तालुक्यातील वडणगे-निगवे रस्त्यावर घडली.
सारिका विठ्ठल महानुर (वय 21, रा. वडणगे) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. सारीका हिचा पती विठ्ठल हा पसार झाला आहे.
कौटुंबिक वादातून हा खुन झाल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. सारीका व विठ्ठल यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.
वडणगे-निगवे रस्त्यावरील एका ठिकाणी ते भाडेकरू म्हणून रहात होते. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून सायंकाळपर्यंत उघडकीस येईल असे सांगण्यात येत आहे.