हा नेता म्हणतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :- विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 3 आठवडे पूर्ण झाल्या नंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे.मात्र सत्तास्थापन झाल्यावर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

शिवसेनेने शुक्रवारी आपल्या आमदारांना ओळखपत्रासह मुंबईला येण्यास सांगितले आहे. ५ दिवस मुंबईत रहावे लागू शकते त्यामुळे कपडे सोबत घेऊन यावेत, असेही सांगण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री पदावरुन भाजप-शिवसेना यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत असताना राज्यातील राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले आहे. भाजपला शह देण्यासाठी शिवेसनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शवली.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये खलबतं सुरु असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. हे तिन्ही पक्ष एकसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्याच्या दिशेने हालचाली करत आहेत.
सरकार कसे असावे याबाबतीत तिन्ही पक्षातील वाटाघाटी पूर्ण झाल्या असून, एक नवीन कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. तसेच तिन्ही पक्षाच्या प्रमुखांमध्ये बैठीकाचा पहिली फेरी झाली असून दुसऱ्या फेरीत शपथविधीची तयारी होणार आहे.असेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
अहमदनगर लाईव्ह 24