वीजबिल भरावेच लागणार; ग्राहकांना वीजबिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल पाठविणाऱ्या वीज कंपन्यांनी दिलेले बिल ग्राहकांनी निमूटपणे भरण्याची तयारी ठेवावी; कारण खुद्द ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना वीजबिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही, असे बजावले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच महावितरणने वीज बिली वसुलीचे आदेश काढले आहेत.

सोबतच वीजबिलाची रक्कम पूर्ण भरल्यास त्यात ग्राहकांना सवलतही दिली जाणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले आहे. ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून मी पूर्ण प्रयत्न केले. मात्र केंद्र सरकारने यात मदत केली नाही. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे त्यामुळे आता सवलत देण्याचा विषय बंद झाला आहे.

महावितरण ६९ हजार कोटींच्या तोट्यात आहे. आता आम्ही कर्ज काढू शकत नाही असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. लॉकडाउनच्या काळात वीज बिल ग्राहकांना अवाच्या सव्वा बिलं आली होती. वीज बिलांमध्ये सवलत मिळावी म्हणून मनसेनेही आंदोलन केलं होतं. राज्य सरकारने याबाबत बैठकाही घेतल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बैठका घेऊन वीज बिलांचा प्रश्न सोडवण्याबाबत चाचपणी केली होती. पण राज्यावरचं आर्थिक संकट पाहता ही सवलत देता येईल की नाही हा प्रश्न होताच. त्यामुळे वीज बिल सवलीताच प्रश्न प्रलंबित राहिला आता उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोणतीही सवलत मिळणार नाही असं सांगितलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

अहमदनगर लाईव्ह 24