अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- नगर शहरात लॉकडाऊन बाबत फेक मेसेज व्हायरल केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या सुहास मुळें यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भादंवि १८८ अन्वये पाचशे रुपयांपैकी पाच रुपयेही दंड भरणार नाही. तर यासंदर्भात आवश्यक ते सर्व पुरावे असल्याने ही केस चालविण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते सुहास मुळे यांनी ‘अहमदनगर लाईव्ह २४. कॉम’शी बोलतांना केलाय.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी मुळे यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, की मी ‘फेक मेसेज व्हायरल केला नसून यावर माझा आक्षेप आहे.
अहमदनगर शहरात लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात पडताळणी करण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर जी बैठक पार पडली, त्या बैठकीसंदर्भात हा मेसेज आहे.
मात्र या मेसेजमध्ये सदर बैठकीत लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात निर्णय झाला, असे मी कुठेच म्हटले नाही. मात्र खरोखरंच अशी बैठक पार पडली,
शहरात लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात ठराव मांडण्यात आला, आणि तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे, असा माझ्या मेसेजमध्ये स्पष्ट उल्लेख आहे.
त्यामुळे मी व्हायरल केलेला तो मेसेज ‘फेक’ कसा काय असू शकतो? या बैठकीचे पुरावे आणि रेकॉर्डिंग माझ्याकडे असून माझी बाजू मी कोर्टात मांडणार आहे.
मात्र जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या परवानगीशिवाय मेसेज व्हायरल केल्याचा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. परंतु दंड न भरता ही केस चालविणार असल्याचे मुळे म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews