तृप्ती देसाई यांच्या तोंडात शेण घालणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळे फासायच्या आधी आम्ही तृप्ती देसाईच्या तोंडात शेण घालू, असा इशारा कळसच्या इंदूबाई वाकचौरे यांनी दिला. कळस बुद्रुक ग्रामपंचायतीने निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या ग्रामसभेत त्या बोलत होत्या.

ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून विष्णू महाराज वाकचौरे होते. यावेळी सरपंच योगिता वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वाकचौरे, अरूण वाकचौरे, संभाजी वाकचौरे, डी. टी. वाकचौरे आदी उपस्थित होते.

आम्ही इंदोरीकर महाराजांच्यासोबत आहोत, असा ठराव मालती गोसावी यांनी मांडला. त्यास अनुमोदन देताना वाकचौरे बोलत होत्या. संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेे, ‘भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा’,

या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायावर कोणी आघात करीत असेल, तर त्यास महिला जशास तसे उत्तर देतील, असेही त्यांनी ठरावाला अनुमोदन देताना सांगितले.

अकोले तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन प्रा. विवेक वाकचौरे यांनी कळस गावात इंदोरीकर महाराजांची कॅसेट पहिल्यांदा काढली. त्यानंतर ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले. महाराजांवर काही संकट आले, तर कळस गाव सर्वात पुढे राहिल.

रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी इंदोरीकर महाराजांनी आपल्या शैलीने अनिष्ठ प्रथा बंद करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे काही व्यक्तींचा जळफळाट होत आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करू, असे मत व्यक्त केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24