महाराष्ट्र

पोलीस चौकशी होणार का? देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, पोलिस स्टेशनला जाण्याची आवश्यकता…

Published by
Ahmednagarlive24 Office

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज चौकशी होणार असून त्या बाबत त्यांनी ट्विट (Tweet) करून माहिती दिली आहे. ही चौकशी त्यांची राहत्या घरी होणार असल्याचे समजत आहे.

याबाबत देवेंद्र फडणवीस यांना आधी चौकशीसाठी आज सकाळी ११ वाजता वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस (Police) ठाण्यात बोलावलं होतं. मात्र फडणवीस आज बीकेसी पोलीस ठाण्यात जाणार नाहीत तर पोलीस अधिकारीच फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन चौकशी करणार आहेत. असे फडणवीसांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

या ट्विट मध्ये म्हटले आहे की, “सहपोलीस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही.

आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील (Pune) सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जयहिंद, जय महाराष्ट्र !” असे ट्विट यावेळी त्यांनी केले आहे.

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या फोन टॅपिंगप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आणि याच प्रकरणासंदर्भात फडणवीसांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office