नगराध्यक्षपदासाठीचा दिलेला शब्द विखे पाटील पाळणार का?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- शिर्डी नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षांना कालावधी दिलेल्या शब्दाप्रमाणे संपल्याने आता नवीन नगराध्यक्षपदाच्या निवडीबाबत घडामोडींना वेग आला आहे.

नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईनिर्माण गूप आणि नागरसेवकांसमोर जगन्नाथ गोंदकर यांना

सव्वा वर्षानंतर नगराध्यक्ष पदाचा दिलेला शब्द पाळणार कि अन्य नगरसेवकांच्या गळ्यात नगरध्यक्षपदाची माळ टाकणार याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान आम्हाला नगराध्यक्ष पदाचा विखे पाटील पिता पुत्रांनी दिलेला शब्द निश्चित पाळतील अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये सुरू झाली असुन आता विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागुन आहे.

शिर्डी नगरपंचायतीत विखे प्रणीत भाजपाचे पुर्ण बहुमत आहे. गोंदकर यांची नगराध्यक्षपदी वर्णी यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. मात्र विखे पाटलांनी अर्चनाताई कोते यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले.

व कोते व गोंदकर यांना सव्वा सेवा वर्षाचे नगरध्यक्षपद देण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान नगराध्यक्षा कोते यांच्या सव्वा वारसाची कारकीर्द संपून दोन वर्षे झाली.

पण याबाबत विखे पाटील काही बोलायला तयार नाही. नगराध्यक्षांचा राजीनामा देवून विखे पाटील यांनी गत निवडणुकीत दिलेला शब्द पुर्ण करून जगन्नाथ गोंदकर यांना

नगराध्यक्ष करावे यासाठी आता नगरसेवकांमध्ये लॉबिंग सुरू झाले आहे. दरम्यान निवडणुकीत दिलेला शब्द विखे पाटील कसा पूर्ण करणार याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागून आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24