लोकं मेल्यावर तुमचा आरोग्य विभाग काम करणार का? नागरिकांचा संतप्त सवाल…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर शहरात कोविड-19 चा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. तशातच पावसाचे दिवस असल्याने साथीचे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाच स्टेशन रोड अहमदनगर येथील हेरिटेज अपार्टमेट आणि लिना पार्क मधील ड्रेनेज व बाहेरचे येणारे मैलामिश्रीत पाणी काढण्याच्या संदर्भात अनेकदा नागरिकांनी महापालिका प्रशासन यांचेकडे तक्रारी केल्या आहेत. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे स्थानिक नागरिकांनी व प्रभाग 11 चे नगरसेवक श्री अविनाश घुले यांनी शहराचे आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांना सदरची अडचण  सांगितली. त्यानंतर आ.श्री संग्राम भैय्या जगताप यांनी महापालिका आयुक्त श्री मायकलवार साहेब व इतर अधिकारी यांचे सोबत 19 जुलै 2020 रोजी हेरिटेज अपार्टमेट आणि लिना पार्क येथे भेट देऊन प्रत्यक्षात पहाणी केली.

आमचे अपार्टमेट मध्ये एकंदरीत 54 कुटुंब रहायला असुन जवळपास 200 नागरिक आहेत.  वास्तविक पाहता हातमपुरा व त्या भागातील ड्रेनेज हे हेरिटेज अपार्टमेट आणि लिना पार्क मधील ड्रेनेज ला जोडून दिल्याने व ते तुंबले असल्याने मैलामिश्रीत पाणी हेरिटेज अपार्टमेट आणि लिना पार्क मधील पार्किंग मध्ये घुसले आहे.

दोनच दिवसात सदरचे मैलामिश्रीत पाणी काढण्याच्या सुचना व आदेश आ.संग्राम जगताप साहेब व महापालिका आयुक्त साहेब यांनी संबंधित आरोग्य अधिकारी व भुयारी गटारी विभाग अधिकारी आणि अतिक्रमण विभाग यांना दिले. परंतु आता आठ दिवस उलटून सुद्धा आरोग्य विभाग व इतर अधिकारी यांनी हेरिटेज अपार्टमेट मधील ड्रेनेज व बाहेरचे येणारे मैलामिश्रीत पाणी काढले नाही. तसेच सदरचे मैलामिश्रीत पाणी आमच्या पार्किंग मध्ये घुसले असल्याने आमच्या पिण्याचे पाण्यात सुध्दा घाण पाणी घुसले आहे.

गेल्या दिड दोन महिन्यांपासून आमची काहीच चुक नसताना विनाकारण आम्ही नरकयातना भोगत आहोत, त्यामुळे आमच्या अपार्टमेट मधील  लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. सध्या साथीचे रोगराई पसरत आहे आणि अनेक जण दररोज सर्दी, खोकला, ताप तसेच मैलामिश्रीत पाण्यावर डास झाल्याने आजारी पडत आहेत.

आरोग्य विभागाचे अधिकारी दररोज काहीतरी नवीन नवीन प्रोब्लेम सांगतात आणि मुख्य म्हणजे मैलामिश्रीत पाणी बाहेर काढण्याचा आणि तुंबलेले ड्रेनेज संदर्भातील प्रश्न मार्गी लागत नाही. मा. आयुक्त साहेब आता तुम्हीच सांगा कि,  आमच्या भागातील लोक मेल्यावर तुमचा आरोग्य विभाग व इतर अधिकारी आमचा मैलामिश्रीत पाणी काढण्याचा प्रश्न सोडविणार आहेत का ? असा संतप्त सवाल हेरिटेज अपार्टमेट आणि लिना पार्क मधील नागरिक विचारतात.

आम्ही सगळे स्थानिक नागरिक वेळेवर घरपट्टी, पाणी पट्टी भरतो. आमच्या घरपट्टी च्या बिलात सुध्दा पाणी कर,वृक्ष कर,शैक्षणिक कर इत्यादी  कर लावले जातात आणि आम्हाला महापालिका कडून कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. दोनच दिवसात जर आमचा मैलामिश्रीत पाणी आणि तुंबलेले ड्रेनेज संदर्भातील प्रश्न मार्गी लागला नाही तर कोणत्याही प्रकारची पुर्व सूचना व निवेदन न देता

आमच्या अपार्टमेट मधील 54 कुटुंब आणि प्रभाग 11 चे नगरसेवक श्री अविनाश घुले यांचे सह कोठी रस्त्यावर कधिही आणि केव्हाही  मुलाबाळांसह व महिलांसह रास्तारोको अंदोलन करतील, मग कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी महापालिका प्रशासन यांची राहिल याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा.

ॲड शिवाजी अण्णा कराळे, स्थानिक रहिवासी हेरिटेज अपार्टमेट अहमदनगर  99 22 545 545

अहमदनगर लाईव्ह 24