बाबांच्या आशीर्वादाने मी आज मंत्री झालो!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- मी गेल्या१७ वर्षांपासून न चुकता वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी बाबांच्या समाधीची महापूजा करण्यासाठी येत आहे. मी जिल्हा परिषद सदस्य होतो पण बाबांच्या आशीर्वादाने मी आज मंत्री झालो.

असे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर  संत श्रेष्ठ वामन भाऊ यांच्या ४५ व्या पुण्यतिथीनिमित्त ना. मुंडे यांच्या हस्ते बाबांच्या समाधीची विधीवत पूजा व अभिषेक करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी  पंकजा मुंडे म्हणाल्या मी गडाची भक्त आहे. मी मंत्री असताना गडाच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता.

मात्र आताच्या सरकारने अवघे दोन कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे. मी विरोधकांना विकास कामासाठी शुभेच्छा देते  असा टोला धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला.

त्यावर धनंजय मुंडे म्हणाले, मागील सरकारचे ५० कोटी रुपयाचे  बजेट होते  त्यातील दोन कोटी रुपये चा निधी मंजूर होऊन कामास सुरुवात झाली आहे.

मात्र पुढील एक वर्षात मागच्या सरकारने घोषणा केलेल्या विकास निधी पेक्षा पाच रुपये तरी जास्त या गडाला विकास निधी मंजूर करू व प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू अशी ग्वाही देतो.

आम्हाला  गडाच्या विकासासाठी आशीर्वाद मिळाले आहेत जन्मभर विरोधकांकडून सेवा करण्यासाठी आम्हाला असेच आशीर्वाद  मिळो, असा त्यांनीही पंकजा मुंडे यांना टोला लगावला. यावेळी अनेक मान्यवरांसह परिसरातील भाविक उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24