अनिल भैया राठोड यांच्या निधनाने गोरगरीब व जनसामान्यांचा लढवय्या नेता हरपला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते आणि माजी मानती अनिल राठोड यांचं आज पहाटे निधन झालं. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहिली.

अहमदनगर शहराचे पंचवीस वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व करताना माजी मंत्री अनिल भैया राठोड यांनी आपल्या कामाचा राज्यभर ठसा उमटवला. धडाडी व आक्रमकते बरोबर त्यांनी विकास कामांना कायम प्राधान्य दिले. 

गोरगरीब सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. शिवसेनेतील राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असे त्यांच्या नेतृत्वाची ओळख ठरल .

त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील गोरगरीब व जनसामान्यांचा लढवय्या नेता हरपला असल्याची भावना राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24