महाराष्ट्र

टोमॅटो चे दर वाढल्याने हॉटेलमधील जेवणासाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार

Published by
Ahmednagarlive24 Office

Tomato rate : किरकोळ बाजारात अद्यापही टोमॅटोचा दर कमी होताना दिसत नसल्याने त्याचा फटका हॉटेल चालकांना बसत आहे. पदार्थांमध्ये केल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या वापराने पदार्थ बनवण्यावरची लागत वाढल्याने हॉटेल्सच्या मूळ नफ्यावर परिणाम होत असल्याने टोमॅटोच्या सर्व पदार्थांचे दर वाढवण्याचे संकेत हॉटेल्स चालकांनी दिले आहेत.

असे झाले तर हॉटेलमधील जेवणासाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तूर्त अचानक दर वाढवता येत नसल्याने अनेक हॉटेल्समधून कोशिंबीर आणि सॅलडमधून टोमॅटो वजा केला आहे. ज्या ठिकाणी टोमॅटोला पर्यायी पदार्थ वापरला जाऊ शकतो,

तिथे टोमॅटोची रिप्लेसमेंट केली जात आहे,कोशिंबीर आणि सॅलडमधून टोमॅटो वजा केला आहे. ज्या ठिकाणी टोमॅटोला पर्यायी पदार्थ वापरला जाऊ शकतो, तिथे टोमॅटोची रिप्लेसमेंट केली जात आहे,अथवा केचपचा वापर केला जात आहे.

फ्रँचायझी उपाहारगृहे मात्र नाइलाजाने अजूनही टोमॅटोचा वापर करत आहेत. उपाहारगृहातील बहुतांश पदार्थांत टोमॅटोचा वापर होतो. त्यातही शुद्ध शाकाहारी उपाहारगृहांत टोमॅटोचा वापर तुलनेने अधिक असतो. कोणताही रस्सा टोमॅटोशिवाय होत नाही.

साऊथ इंडियन उपाहारगृहांत सांबार आणि वेगवेगळ्या चटणीत पावभाजी, टोमॅटो सूप, टोमॅटो ऑम्लेट, सलाङ यात टोमॅटो अधिक वापरला जातो. टोमॅटोचे दर जसजसे वाढू लागले तसा नफा घटला. कोशिंबीरमधून टोमॅटो गायब केला तरी अन्य पदार्थात तो वापरावाच लागत असल्याने रोज टोमॅटो दरवाढीचा फटका बसत आहे.

मागील महिन्यापासून दर वाढल्याने सूप आणि जेवणातून टोमॅटो वगळण्यात येत आहे. फेस्ट आणि कॅन असे दोन प्रकारचे टोमॅटो वापरले जातात. बाजारात टोमॅटोची रेडिमेड प्युरी मिळते. परंतु चवीमध्ये फरक पडतो.

टोमॅटोची चव पदार्थाला देण्यासाठी दही किंवा चिंचेचा वापर करता येतो. सध्या हॉटेलमध्ये डिशला लाल रंग देण्यासाठी लाल सिमला मिरची वापरली जात आहे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर टोमॅटोचे दर गेल्याने अनेकांनी जेवणातून टोमॅटो कमी केले आहेत. टोमॅटोचे दर काही दिवसांत कमी होतील असे वाटत असताना मागील महिन्यापासून दर वाढतच आहेत. यामुळे उत्पन्नात घट झाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Tomato Rate