‘ते’ काळे विधेयक मागे घ्या…कोपरगावातुन मुख्यमंत्र्यांना एक हजार पत्र रवाना

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चालु हिवाळी अधिवेशनात अनाधिकाराने विद्यापीठ सुधारणा कायद्यात बदल केला आहे. तेव्हा हे काळे विधेयक तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.

यासाठी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोपरगांवातुन तब्बल एक हजार पत्र पाठवण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान या पत्रामध्ये म्हंटले आहे कि, विद्यापीठे ही विद्येची पवित्र मंदिरे आहेत मात्र त्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांची सोय लागावी

त्यातुन राजकीय पोळी भाजली जावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कुठलाही अभ्यास न करता या विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यांचे काळे विधेयक ऐनवेळेस विधीमंडळात आणून लोकशाहीचा अपमान केला आहे.

तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड भूमिका मांडत त्याला कडाडुन विरोध केला व भाजपाच्या वतीने राज्यात हल्लाबोल करून याबाबत जागृती करण्यांचे सुतोवाच केले होते. त्याचाच एक भाग म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने हे अभियान घेण्यात आले.