लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यात विवाहितेची आत्महत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

यवतमाळ : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहिली दिवाळी आटोपून सासरी आल्यानंतर ही घटना घडली. काजल विशाल काटकर असे या मृत महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी यवतमाळच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाच्या पाच महिन्यानंतर विवाहितेला आत्महत्या करावी लागल्याने हळहळ व्यक्त होत (Bride suicide due to Dowry Harassment) आहे.

काजलचा विवाह जुलै महिन्यात झाला होता. सासरच्या लोकांनी सुरुवातीचे काही दिवस चांगले वागवले. त्यानंतर पाच लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ सुरु केला. याची माहिती काजलने माहेरी सांगितली.

मात्र सर्व सुरळीत होईल, असे म्हणत तिच्या माहेरच्यांनी समजूत काढली. ती दिवाळी निमित्ताने माहेरी आली होती. दिवाळीनंतर परत सासरी गेल्यानंतर काजलने आत्महत्या केल्याची माहिती तिच्या माहेरी नातेवाईकांना कळवण्यात आली.

यानंतर तिच्या माहेरच्याकडून पती विशाल, सासू प्रतिभा, सासरे ज्ञानेश्वर, नणंद प्रीती बुटले, शैलेश बुटले, शिल्पा शिरभाते, संदीप शिरभाते यांच्यावर छळ केल्याचे आरोप करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांकडून पती विशाल काटकर, नंदइ संदीप शिरभाते या दोघांना अटक केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24