कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाही : माजी आमदार स्नेहलता कोल्हे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- सरकारी कुमक असलेल्या कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित राहू शकत नाही, तर राज्यातील महिलांना हे राज्य सरकार संरक्षण कसे देऊ शकेल,

पनवेल येथील कोविड सेंटरमध्ये घडलेली घटना लांच्छनास्पद असून या घडलेले घटनेमुळे कोरोनाच्या परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.

सध्या राज्यभर कोरोना आजाराच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, अशा परिस्थितीत कोविड सेंटरमध्ये घडलेला प्रकार निंदनीय असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

त्यामुळे कोविडची लक्षणे असली, तरी उपचारासाठी जावे की नाही? अशी धास्ती महिलांमध्ये निर्माण झाली. या गोष्टीचा सरकारने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कोरोना बाधित महिला उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल होते.

त्या ठिकाणी तिला उपचार करून लवकर बरे होणे अपेक्षित असताना आयुष्यात अशा विपरित प्रसंगाला तिला सामोरे जावे लागते, ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची बाब आहे. कोविड सेंटरमध्ये महिला उपचारासाठी दाखल झाली.

त्यावेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले डॉक्टर्स, नर्सेस आदी उपस्थित नव्हते का? जर उपस्थित असतील, तर मग घटना घडलीच कशी? या प्रश्नांमुळे प्रशासनाची व्यवस्थेवर पकड नसल्याचे सिद्ध होत असून

सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसते. त्यामुळे त्या कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाची चौकशी व्हावी, या घटनेचा शासनाने विचार करून आरोपीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24