मालपाणी हेल्थ क्लबमध्ये कामगाराची आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर ;- येथील मालपाणी हेल्थ क्लबमध्ये सफाईचे काम करणाऱ्या नीलेश चव्हाण या ३२ वर्षांच्या युवकाने क्लबच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी घडली.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मालपाणी हेल्थ क्लबच्या ट्रॅकशेजारी असणाऱ्या इमारतीवरून या युवकाने सायंकाळी ७ च्या दरम्यान ८० फूट उंचीवरून उडी घेतली.

त्याचा डोक्याला जबर मार लागला. त्यास तातडीने मालपाणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे शहर पोलिसांना कळवले. नीलेशच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

वैयक्तिक कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे समजते. या अगोदरही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एका कर्मचाऱ्याने त्यास तातडीने बाजूला ओढून वाचवले होते, अशी चर्चा आहे. 

पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. एका खासगी कंपनीमार्फ़त नीलेश हेल्थ क्लबच्या साफसफाईचे काम करत होता. शहरातील मालदाड रोड परिसरात तो रहात होता.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24