वॉशिंग्टन: कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. मागेपुढे यावर लस येऊन हा आजार बारा होईलही. परंतु याह परिणाम दीर्घकाळ जगाला भोगावा लागणार आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे.
यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अमेरिकेतील कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. यामुळे जवळपास कोट्यवधी लोक बेरोजगार होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सद्य परिस्थितीला अमेरिकेत ३० लाख लोकांनी बेरोजगारी लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे. अमेरिकेत अधिकतर राज्यातील उद्योग पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
त्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात लोकांचा रोजगार गेला आहे.गुरुवारी सरकारने दिलेल्या माहितीनुसार करोना व्हायरसमुळे गेल्या दोन महिन्यात ३.६ कोटी लोकांनी बेरोजगारी लाभ मिळावा यासाठी अर्ज केला आहे.
याशिवाय गेल्या आठवड्यात ८.४२ लाख लोकांनी अन्य योजनांमार्फत मदतीसाठी अर्ज केला. भारतात देखील बेरोजगारीचे संकट आले आहे. महिनाभरात १२ कोटी २० लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत.
गेल्या काही वर्षांतील बेरोजगारीचा हा उच्चांकी स्तर असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया इकॉनॉमी या संस्थेने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
यांना बसेल फटका भारतात असंघटीत क्षेत्रापाठोपाठ आता कॉर्पोरेट आणि स्टार्टअप , छोटे मोठे उद्योग यांनीही नोकर कपातीचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे नजीकच्या काळात बेरोजगारी आणखी वाढेल, असा इशारा त्यांनी दिला. लघु आणि मध्यम उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्या, वाहन क्षेत्र, एफएमसीजी, स्थावर मालमत्ता या क्षेत्रातील कंपन्यांना मंदीचा जबर फटका बसला आहे.