अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी : या तालुक्यात टोळधाड सदृश्य किडे आढळून आले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-राज्यात टोळधाड येऊ शकते अशी शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी माहिती मध्यंतरी कृषी विभागाने दिली होती. त्यामुळे कोरोनाने आधीच कंबरडे मोडलेला शेतकरी यामुळे हतबल झाला आहे.

आता कोपरगाव तालुक्यातील वडगाव बक्तपूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतात टोळधाड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दशरथ रावबा डोंगरे असा या शेतकऱ्याचे नाव असून शेतात असलेल्या गिन्नी गवतावर टोळधाड सदृश्य किडे आढळून आले आहेत.

रविवारी रात्री वडगाव बक्तपूर येथील शेतकरी संजय कांगणे यांनी दशरथ रावबा डोंगरे यांच्या शेतावर असलेल्या टोळधाड सदृश्य कीड आली असल्याचे फोटो व माहिती कृषी विभागाला कळविली.

सोमवारी सकाळीच तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, मंडळ कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कृषी सहायक निलेश बिबवे, संजय बोंबे यांनी प्रत्यक्षात डोंगरे यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली.

मात्र हे किडे येथेच तयार झालेले असून त्याच्यावर रासायनिक फवारणी करून नियंत्रणात आणता येऊ शकते, असे कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी शेतक-यांना सांगितले. आसपासच्या परिसरातील शेतांची पाहणी केली आहे.

सर्व प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रावर क्लोरोपायरीफॉस या रासायनिक कीटकनाशक प्रमाणानुसार पाण्यात मिसळून फवारणी करावी. या किडीच्या प्रादुर्भावापासून बचाव करायचा असल्यास प्रत्येक शेतक-यांनी सतर्क राहने गरजेचे आहे.

कारण सध्याचे वातावरण या किडीला पोषक असल्याने केव्हाही याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असेही कृषी अधिकारी आढाव यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24