महाराष्ट्र

चिंताजनक बातमी : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तरीही…

Published by
Ahmednagarlive24 Office

corona news : पुण्यात कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या नव्या बीए ४ आणि बीए ५ चे व्हेरिएंटच तब्बल ७ रुग्ण आढळून आले आहेत. हे व्हेरिएंट आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ९ वर्षाचा चिमुकला सोडता सर्वांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

इतकंच नाही तर यातील एकाने बुस्टर डोसही घेतला आहे. तरीही यांना कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. हे व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असल्याचं तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट बीए ४ आणि बीए ५ चे एकूण सात रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. ओमायक्रॉनच्या २ नव्या सब व्हेरिएंट म्हणजेच बीए ४ चे ४ तर बीए ५ चे ३ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ४ पुरुष तर ३ महिला आहेत.

यातील ४ जण ५० वर्षांवरील आहेत, तर २ जण २० ते ४० वर्षे या वयोगटातील आहेत, तर एकजण १० वर्षांखालील आहे. यातील दोन रुग्णांचा दक्षिण आफ्रिका, बेल्जियम प्रवास करून आला आहे. तर ३ जणांनी भारतात केरळ आणि कर्नाटक राज्यात प्रवास केला आहे. तर दोन रुग्णांनी कोठेही प्रवास केलेला नाही.

Ahmednagarlive24 Office