अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- आंबोली येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.
झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली होती. तेथून पुढे 8 ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर पडली. ठिकठिकाणी माती व झाडे दगड अशी पडझड पहावयास मिळाली.
काही ठिकाणी आणखी झाडे पडण्याच्या स्थितीत आहे. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. दरडीमुळे काही प्रवासी अडकून पडले होते.
सावंतवाडी तालुक्यात गेली चार दिवस सतत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाटातील दरड बुधवारी सलग दुसर्यांदा कोसळली.
या चार दिवसातील ही दुसरी घटना असून मुख्य धबधब्याच्या अलीकडे घाटातील दरडीचा छोटा भाग पाण्यासाहित खाली आला.
सुदैवाने या दरडीमुळे कोणताही अपघात झाला नाही. मात्र, आंबोली घाटातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. अखेरीस जेसीबी च्या सहाय्याने घाटातील ही दरड हटवण्यात आली.
बुधवारी सायंकाळी सा.बां.विभागाचे उपकार्यकरी अभियंता अनिल आवटी, सावंतवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत खोत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved