चिंताजनक: मुंबईत एका दिवसात वाढतायत हजार रुग्ण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई 18 मे 2020 :- मुंबईत कोरोनाने चिंताजनक परिस्थिती केली आहे. अनेक उपाययोजनांच्या अम्मलबजावणीनंतरही कोरोना आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही.

मागील २४ तासांमध्ये १ हजार १८५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत मृतांची एकूण संख्या आता ७५७ इतकी झाली आहे. मागील २४ तासांत तब्बल ५०४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने आरोग्ययंत्रणेला काहीसा हुरूप आला आहे.

मुंबईत करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना मुंबई महापालिका प्रशासन उपचारांत अधिक सुसूत्रता आणण्यावर भर देत आहे. करोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत तसेच एकही रुग्ण उपचाराविना राहू नये,

त्यावर वेळीच उपचार व्हावेत, याची दक्षता घेतली जात आहे. मुंबईत एकूण रुग्णसंख्या आता २१ हजार १५२ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या १ हजार १८५ रुग्णांपैकी ८८५ रुग्ण गेल्या २४ तासांत आढळले आहेत तर ३०० रुग्ण १२ ते १६ मे दरम्यान विविध प्रयोगशाळांत घेण्यात आलेल्या चाचण्यांतून आढळले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24