कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्येही चिंताजनक वातावरण तयार झाले आहे. कोल्हापुरात एकाच दिवशी ८ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. एकूण रुग्णसंख्या आता ४४ वर गेली आहे.
मुंबई,पुणे,सोलापूर आदी रेडझोन मधुन कोल्हापूरात येणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, गेल्या शनिवारीपासुन कोरोनाची ही येथे संख्या वाढत आहे.
मुंबई आणि सोलापूर वरून कोल्हापूरात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे आज सकाळी स्पष्ट झाले. पाठोपाठ दुपारी आणखी चौघेजण पॉझीटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून,इंचलकरंजी येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. सोलापुरहुन येथे आलेल्या २३ वर्षीय डॉक्टर तरुणीसह शाहुवाडीतील २२ वर्षाचा तरुण, भुदरगड तालुक्यातील ३२ वर्षाचा तरुण तर आजरा तालुक्यातील ४९ वर्षाच्या पुरुषाचा यामध्ये समावेश आहे.
तर सायंकाळी पन्हाळा तालुक्यातील २६ वर्षांचा एक तरुण, गारगोटी(ता.भुदरगड) मधील २७ वर्षांची एक महिला व एक ८ वर्षांचा लहान मुलगा आणि कोल्हापूर मधील २८ वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे.
पालघर मधून पन्हाळा तालुक्यात एकूण ८ जण आले होते.त्यापैकी एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.