नाशिक 18 मे 2020 :-कोरोनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सध्या प्रशासन सज्ज आहे. संशयितांची घसा आणि नाकातील स्वॅब नमुने घेतले जातात आणि त्यांची चाचणी करून सध्या कोरोनाचे निदान केले जात आहे.
आता याला एक्स-रे चा पर्याय येऊ शकतो. यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचेल. नाशिकमधील ईएसडीएस या आयटी कंपनीनं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे.
ज्यामुळे फक्त एक्स-रे मार्फत कोरोनाव्हायरसं निदान करणं शक्य आहे. प्रायोगिक चाचणीत ही पद्धत यशस्वी ठरल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीची टेस्ट करायची आहे, त्याच्या छातीचा एक्स-रे काढावा लागेल.
या एक्स-रेची डिजीटल प्रिंट या सॉफ्टवेअरमध्ये लोड करावी लागेल. सबमिट टॅबवर क्लिक केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच त्या व्यक्तीचा रिपोर्ट येईल. या सॉफ्टवेअरच्या वापराला आवश्यक ती परवानगी मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.