महाराष्ट्र

होय, मी खोटं बोललो! पण…, खुद्द शरद पवारांनीच दिलीय कबुली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सध्या विरोधकांनी टार्गेट करून टीका सुरू केली आहे. एक तर पवार खोटं बोलतात असा त्यांच्यावर आरोप होतो, आता पवार यांच्यामुळंच जातीयवाद पसरला, असाही आरोप केला जाऊ लागला आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथनपर पुस्तकातील एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. पवार मुख्यमंत्री असताना १९९३ मध्ये मुंबईत जे बॉम्ब स्फोट झाले, त्यावेळचा हा किस्सा आहे. त्यावेळी आपण खोटं बोललो होतो, अशी कबुलीच पवारांनी यामध्ये दिली आहे.

अर्थात खोटं का बोलावं लागलं याचं स्पष्टीकरणही दिलं आहे. पुस्तकात पवारांनी लिहिलं आहे, “त्यावेळी कोणत्याही स्थितीत मुंबईत पुन्हा जातीय दंगली भडकणार नाहीत एवढी खबरदारी माझ्या दृष्टीनं अग्रक्रमाची होती.

तातडीनं दूरदर्शनवरून आणि आकाशवाणीवरूनही जनतेला घटनेची माहिती दिली. त्यावेळी बॉम्बस्फोट १२ ठिकाणी झाले असूनही जाणीवपूर्वक १३ ठिकाणी झाल्याचं मी सांगितलं.

सर्व बॉम्बस्फोट हिंदू बहूल भागात झालेले होते. परंतु कोणतीही जातीय अनुचित प्रतिक्रिया उमटू नये म्हणून मी मस्जिद बंदर या मुस्लीम भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं.

” पुढे या प्रकरणी नेमलेल्या श्रीकृष्ण आयोगासमोर पवारांची साक्ष झाली. १२ ऐवजी १३ का जाहीर केलं? यासंबंधी आयोगानं प्रश्न विचारला. त्यावर पवारांनी उत्तर दिलं की, “माझं विधान असत्य होतं.

पण पुढील संभाव्य हिंसा रोखण्यासाठी शहाणपणानं जाणीवपूर्वक घेतलेला तो निर्णय होता.” ‘धीस इज द एक्सापम्पल ऑफ स्टेटसमनशीप’ अशा शब्दांत आयोगाच्या अहवालात पवार यांच्या या कृतीची दखल घेण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office