महाराष्ट्र

योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी; अखिलेश यादव यांना निमंत्रण, उपस्थित राहणार?

Published by
Ahmednagarlive24 Office

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक (UP Assembly Election result 2022)जिंकत योगींनी पुन्हा सत्ता काबीज केली आहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणूकामध्ये भाजपने (BJP) मोठी आघाडी घेत चार राज्यात सत्ता राखली आहे.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी रणशिंग फुंकले असून आज २५ मार्चला (25 March) योगींचा शपथविधी आहे. या शपथविधीला देशातल्या बड्या नेत्यांसह अनेक मंडळींनी निमंत्रणं दिली गेली आहेत.

योगींच्या आजच्या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे नेते, उद्योगपती, संत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी, गौतम अदानी, आनंद महिंद्रा यांच्या सह देशातील ६० प्रमुख उद्योगपतींना निमंत्रण देण्यात आले आहे.

योगी यांचा शपथविधी सोहळा लखनऊ मधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये होणार असून राज्यपाल आनंदीबेन पटेल योगी आदित्यनाथ यांना शपथ देतील.

दरम्यान, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वरिष्ठ सदस्यांसह प्रमुख संतांना निमंत्रित करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि त्यांचे सहकारी रालोदचे जयंत चौधरी यांनी कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे.

तसेच अयोध्या, मथुरा आणि वाराणसीच्या लोकांसह ५० पेक्षा अधिक संतांसह योगगुरू रामदेव बाबा, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील कलाकार कार्यक्रमात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर प्रदेशातील ८ हजार पोलीस बंदोबस्तासाठी असणार आहेत.

Ahmednagarlive24 Office