Mahashivratri 2024:- यावर्षी आठ मार्च म्हणजेच उद्या महाशिवरात्री असून संपूर्ण देशभरात जल्लोषात महाशिवरात्री साजरी केली जाते. आपल्याला माहित आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर अर्थात महादेवांचे दर्शन घेतले जाते व देशातील कानाकोपऱ्यातून भाविक महत्त्वाच्या शिवमंदिरांना दर्शनासाठी भेट देत असतात.
तसेच जर आपण महाराष्ट्राचा किंवा भारताचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी महादेवाचे मंदिर आहेत. परंतु जर काही महादेव मंदिरांचा विचार केला तर ते अध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून त्यांना विशेष महत्त्व आहे. बरेच भाविक हे महाशिवरात्रीनिमित्त देशातील वेगवेगळ्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी जातात.
परंतु दर्शनासाठी जर जायचे असेल तर महाराष्ट्रातील काही मंदिरे देखील खूप महत्त्वाची ठरतील. तर तुम्हाला देखील महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान महादेवांचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मंदिरांना भेटी देऊ शकतात. याच महादेवाच्या मंदिरांविषयीची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
महाराष्ट्रातील भगवान महादेवाची प्रसिद्ध मंदिरे
1- बाबुलनाथ मंदिर– हे मंदिर मुंबई मध्ये असून एक प्रसिद्ध असे भगवान महादेवांचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक मुंबईमध्ये छोट्या टेकडीवर वसलेले असून मुंबईमध्ये असलेल्या जुन्या मंदिरांपैकी एक मंदिर म्हणून त्याची विशेष ओळख आहे.
हे मंदिर भगवान शिवशंकर यांना समर्पित असून या शिव मंदिरामध्ये भव्य शिवलिंग आहे. तसेच गणपती, हनुमान आणि देवी पार्वतीच्या मूर्ती देखील या ठिकाणी विराजमान आहेत.
या ठिकाणच्या सर्व मूर्ती 12 व्या शतकात मंदिरात ठेवण्यात आले होते असे म्हटले जाते. महाशिवरात्रीला या मंदिराला मोठ्या प्रमाणावर भाविकांची हजेरी लागते. त्यामुळे तुम्ही देखील महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिराला भेट देऊन भगवान शंकरांचे दर्शन घेऊ शकतात.
2- भीमाशंकर( ज्योतिर्लिंग )- बारा ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यामध्ये असलेले महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे संपूर्ण देशातील भाविकांचे एक श्रद्धास्थान असून या ठिकाणी दर्शनाकरिता देशातीलच नव्हे तर परदेशातील असंख्य भाविक दरवर्षी भेट देत असतात.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सह्याद्रीच्या डोंगर रांगातील घाट प्रदेशात स्थित आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे आहे व हे खास वैशिष्ट्य आहे.
3- कैलास शिवमंदिर वेरूळ( घृष्णेश्वर मंदिर)- औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या वेरूळच्या लेणी खूप प्रसिद्ध आहेत व या वेरूळ ठिकाणीच कैलास महादेव मंदिर अर्थात घृष्णेश्वर मंदिर आहे. भगवान महादेवांना समर्पित असलेले हे मंदिर खूप प्रसिद्ध असून या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे एका मोठ्या खडकामध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे
व हे सगळे काम कोरीव पद्धतीचे आहे. या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर वेरूळ लेण्या पाहण्याचा आनंद घेऊ शकतात व सोबतच भगवान महादेवांचे दर्शन देखील घेऊ शकतात.