महाराष्ट्र

समन्यायी कायद्याच्या पापाची जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : समन्यायी पाणी वाटप कायद्याचे विधेयक सभागृहात मांडून जिल्ह्याचे हक्काचे पाणी सोडण्यास समर्थन देणारेच आज पाणी सोडण्यास विरोध केल्याची भाषा करू लागले असले तरी, जिल्ह्याच्या मानगुटीवर बसविलेल्या या कायद्याच्या पापाची जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही, अशी परखड टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखायाची ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन कैलास तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, ट्रस्कः सोसायटीचे चेअरमन नंदु राठी, व्हा.चेअरमन सतिष ससाणे, मच्छिद्र थेटे यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत कारखान्याच्या वतीने विकसीत करण्यात आलेल्या प्रवरा किसान अॅपचे विमोचन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, पावसाची चिता संपलेली नाही. मराठवाड्याला पाणी देण्याबाबतची टांगती तलवार आपल्यावर कायम आहे. ज्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत जिल्ह्याच्या मानगुटीवर बसविले, तेच आता मी पहिल्यांदा विरोध केल्याची भाषा बोलू लागले आहेत;

परंतु पाणी सोडण्याला तुम्ही समर्थन दिले, हा इतिहास का विसरता ? असा सवाल करुन, जाणत्या राज्याच्या उपस्थितीत पाणी सोडण्यास दिलेल्या मान्यतेचे दाखले त्यांनी सभेत सभासदांना दाखविले.

यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी, उपलब्ध पाण्याचा उपयोग करून उसाची लागवड मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी. पुढच्या वर्षीचा ३ हजार रुपये भाव आपण चार महिन्यांपूर्वीच जाहीर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, ज्यांचे एक रुपयांचे योगदान नाही ते आपल्या विरोधात गप्पा मारतात. उलट आता मी चिंतामुक्त झालो असल्याने चांगले काम करीत राहणार आहे.

खासदार साहेबांनी मला राजकारणात कोणालाच मोकळे सोडायचे, नसते ही शिवकण दिली, त्याचा योग्य उपयोग मी आता करणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. आणासाहेब म्हस्के यांनी सहकार चळवळीतून मिळालेला नावलौकीक टिकवून ठेवण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध नाही; परंतु या कायद्याबाबत फेरविचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे पाऊल टाकले आहे. या माध्यमातूनच दोन जिल्हातील वाद कायमस्वरुपी मिटविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

याबरोबरच पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office