धनंजय मुंडे यांना आपण कधीही साथ दिली नाही – देवेंद्र फडणवीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
मुंबई :- गोपीनाथगडावर खडसे ज्या प्रकारे बोलले ते बोलले नसते तर बरे झाले असते, अशी खंत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडे यांना आपण कधीही साथ दिली नाही. याउलट जेव्हा कधी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आरोप केले तेव्हा कायम विधिमंडळात मी पंकजा यांच्या पाठीशी उभा राहिलो.
यापुढेही त्यांना साथ देईन, असेही ते म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
परळी येथे गोपीनाथगडावर आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांनी भाषणात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या टीकेचा रोख हा अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरच होता.
त्याबाबत फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ खडसे यांचे तिकीट राज्यपातळीवर नाही, तर केंद्रीय पातळीवर कापण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24