‘ह्या’ गावच्या सरपंचानी जे काम केलय ते वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे ग्रामीण भागातील जनता अडचणीत असून हाताला काम नसल्यामुळे खेड्यातील गरीब जनता आर्थिक संकटात आहे. 

अशा परिस्थितीमध्ये आधार म्हणून वडुले खुर्द ता. शेवगावचे  लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब सोपान आव्हाड यांनी स्वतः च्या खिशातून माहे. एप्रिल व में २०२० या दोन महिन्याची पाणीपट्टी स्वतः भरण्याचा निर्णय घेऊन पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायतला भरली आहे.

हा निर्णय घेऊन ग्रामस्थांना एक अनोखी भेट दिली आहे. प्रतिनिधीक स्वरूपात श्रीराम जनार्धन रणमले, सुनील दत्तू आव्हाड या दोन ग्रामस्थांना पाणीपट्टी च्या पावत्यांचे वाटप केले असून ग्रामसेवक नवले म्हंटले की सरपंच यांच्या या निर्णयामुळे गरिबांना मदत होऊन ग्रामपंचायतचे पाणीपट्टी वसुलीचे उद्दीष्ट देखील पूर्ण होणार आहे.

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत ने सर्व उपाय योजना राबविल्या असून सोडियम क्लोराईड फवारणी दोन वेळा केली आहे. सॅनिटाझर  व स्वच्छता साहित्य व दिव्यांगाना किराणा मालाचे वाटप केले आहे.

ग्रा.प.च्या वतीने कोरोना बद्दल जनजागृती चे काम नित्य नियमाने होत असून गुरुवारी भरणारा आठवडे बाजार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना प्रादुर्भाव काळात आपत्ती व्यवस्थापन समिती,उपसरपंच बापूसाहेब आव्हाड ग्रा.प.सर्व सदस्य ग्रामसेवक अशोक नवले,तलाठी श्रीम.सोनाली दहिफळे,पोलीस पाटील बाळासाहेब तुकाराम आव्हाड, ग्रा.प.कर्मचारी,ग्रामस्थ साथ देत असून मदत करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24