अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संक्रांतीच्या वाणाचे मडके घरासमोर का फोडले असे विचारले असता राग येऊन तरुणीस व तिच्या वडिलांना दगडाने मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारती रावसाहेब सोमवंशी (रा.आंधळे रो हाउसिंग सोसायटी, केडगाव देवीच्या मागे) यांनी राकेश शिंदे (पूर्ण नाव माहित नाही) याला संक्रांतीच्या वाणाचे मडके आमच्या घरासमोर का फोडले अशी विचारणा केली असता त्याचा राग येऊन शिंदे याने भारती हिस दगडाने मारहाण केली.
हे पण वाचा :- चार वर्षे झाली तो बेपत्ता आहे ! वयोवृध्द आई म्हणाली बाळा अजिंक्य! तू जिथं असशील….
तसेच तिचे वडील हा प्रकार सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही हाताने, दगडाने व काठीने मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच यापुर्वीही शिंदे याने भारती हिची छेड काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.