अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- हातात असलेल्या झेंड्याचा वीजवाहक तारेला स्पर्श होऊन महाविद्यालयीन तरुण अमोल भगवान कोंढरे (20) या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी कोपरगाव तालुक्यात घडली.
हे वाचा :- कॉल गर्ल गँगच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
विद्युत वाहक तारेला झेंडा चिटकल्याने त्यात विद्युत प्रवाह येऊन निफाडमधील ह्या युवकाचा मृत्यू झाला. निफाड तालुक्यातील वाकद शिरवाडे गावातून ३० जणांची ही साई पालखी शिर्डीकडे निघाली होती.
हे वाचा :- अहमदनगर च्या राजकारणाबाबत आमदार रोहित पवारांचे मोठे वक्तव्य
कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात रात्री साडेदहा वाजता ही पालखी पोचली. जेवण झाल्यानंतर ही पालखी ११ वाजता शिर्डीकडे निघाल्यानंतर अमोल भगवान कोंढरे याने आपल्या हातातील झेंडा वरती केला.
हे वाचा :- विखे पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश
हा झेंडा वर असणाऱ्या विद्युत वाहक तारेला चटकल्याने अमोल कोंढरे या युुुुवकाचा जागीच मृत्यू झाला. अमोल हा एनसीसी कॅडेट असल्याने लवकरच भारतीय सैन्य दलात भरती व्हायची त्याची इच्छा होती.
हे वाचा :- हॅपी एंडिंग’ कोड सांगितल्यावर मिळायच्या सेक्ससाठी मुली !
घटनेनंतर ग्रामस्थांसाह पालखीतील इतर साईभक्तांनी अमोल याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.