अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे: सावत्र बापच गेल्या दोन वर्षापासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दामिनी पथकाच्या महिला मार्शलने शाळेत धाव घेतली.
तसेच पीडित मुलगी आणि तिच्या आईला पोलिस ठाण्यात घेऊन जात आरोपी बापावर बलात्कार व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांना परिसरातील एका शाळेतून कॉल आला.
शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे आणि मुलीचे पालकही शाळेत आले आहेत, अशी माहिती मिळाली त्यानुसार दामिनी मार्शलने घटनास्थळी धाव घेत मुलीची चौकशी केली असता जन्मदाता बापच मुलीवर अत्याचार करत असल्याचे स्पष्ट झाले. यातून मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्याचे सांगण्यात आले.