४ फेब्रुवारीला होणार होते तिचे लग्न पण त्या अगोदरच झाला संशयास्पद मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- : नागपूर जिल्ह्यातील धानला येथील युवतीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी भंडारा जिल्ह्यातील जाख शिवारात (ता. भंडारा) संशयास्पद स्थितीत आढळून आला

घरी आणलेला तिचा मृतदेह पाहून आजीचाही मंगळवारी (७ जानेवारी) हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, ४ फेब्रुवारीला अश्विनीचे लग्न होणार होते.अश्विनी ही मौदा येथील डी. डी. भोयर महाविद्यालयाची बीएस्सीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. 

सोमवारी सायंकाळी सहा वाजता भंडाऱ्याजवळ महामार्गावरील मुजबी गावाजवळून जाणाऱ्या गुंजेपार येथे अश्विनीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.

तिचा मृतदेह घरी आणण्यात आला. अश्विनीचा मृतदेह पाहून आजी सीताबाई श्रावण ठोंबरे (७०) यांचा हृदयविकाराने मंगळवारी मृत्यू झाला.

अश्विनी व आजी सीताबाई यांच्यावर सायंकाळच्या सुमारास शोकाकुल वातावरणात धानला येथील स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनास्थळी जमलेल्या गावकऱ्यांना आमदार सावरकर यांनी मारेकऱ्यास शिक्षा द्यावी, अशी मागणी केली असता, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24