अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- प्रवरा नदी पात्रात तोल गेल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सचिन संजय जोशी (वय 25) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथिल रहिवाशी असल्याचे समजले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथिल रहिवाशी असलेला सचिन जोशी हा तरुण बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास प्रवरा नदी पुलावर बसलेला होता.
यावेळी सचिनचा पुलावरून तोल गेल्याने तो थेट पाण्याने भरलेल्या नदी पात्रात पडला. परंतु बराचं वेळ होऊनही सचिन बाहेर न आल्यामुळे सचिनला शोधण्यासाठी ग्रामस्थांची मदत घेण्यात आली.
अखेर रात्री 10.30 वाजेच्या सुमारास सचिनचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान सचिनच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सचिनच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्याच्या अकस्मित व दुर्दैवी निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved