अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- मोकळी जागा दिसली कि त्याठिकाणी अतिक्रमण झालेच समजायचे. मात्र याच अतिक्रमणामुळे अनेक आरक्षित जागेंवर बेकायदेशीर ताबा मिळवला जात आहे.
प्रशासकडून कानाडोळा केले जात असल्याने अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे जिल्हा परिषद शाळेचय मैदानावर चहूबाजूने होणारी अतिक्रमणे,
बैलबाजारात ग्रामपंचायतींकडून आकारला जाणारा बेकायदा कर अशा विविध प्रश्नांबाबत कार्यवाही करावी या मागणीसाठी काष्टी येथेल तरूणांनी नगरमध्ये जिल्हा परिषद मुख्यालयासमोर उपोषण केले.
विक्रम संभाजी पाचपुते, सचिन सुदाम पाचपुते,अमित शेटे, अण्णा राऊत हे या उपोषणात सहभागी झाले होते. विविध प्रश्नासाठी मागील सहा वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासन दाद देत नसल्याने
उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचे विक्रम पाचपुते यांनी यावेळी सांगितले. काष्टी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर चारही बाजूंनी अतिक्रमणे होत आहेत.
जि.प.शाळेच्या मैदानावर गावाच्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत. त्या पाण्याच्या टाकीचा विषय मा.न्यायालयात सुरू असून आता जिल्हा परिषदने सरकारी दवाखाना शाळेच्या मैदानावर घेतल्यामुळे काष्टीतील तरुणांमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे.
अशाप्रकारची अतिक्रमणे वाढत गेली तर भविष्यात मुलांना, गावाला असे मैदान उपलब्ध करून देता येणार नाही, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved