राहुरी :- मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या पाथरे खुर्द येथील गणेश मोतिराम हापसे (३०) या तरूणाने प्रवरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. स्थानिक शेतकऱ्यांनी नदीपात्रात गणेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आत्महत्या केलेल्या नदीपात्राच्या ठिकाणाची खोली २० फुटांच्या पुढे होती.
सायंकाळी अंधार पडल्याने शोधकार्यावर मर्यादा आल्या. बुधवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू झाल्यावर दुपारी गणेशचा मृतदेह हाती लागला. हेड काॅन्स्टेबल आयुब शेख, काॅन्स्टेबल महेश भवर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.